Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कामगार नेते  यशवंत भोसले यांच्या विनंती नुसार पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ पुणे म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव  आढळराव पाटील यांनी संत तुकाराम नगर पिंपरी येथे म्हाडाच्या घरांची पाहणी केली व म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले.

याप्रसंगी व कामगार नेते मा यशवंत भाऊ भोसले यांच्या हस्ते मा शिवाजीदादा आढळराव पाटील यांचा म्हाडाचे अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी  खासदार  अमर साबळे, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील  प्रकल्प अधिकारी मोरडे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष मा सदाशिव खाडे, माजी नगरसेवक बबनराव गाढवे, मा नगरसेविका सुजाता पालांडे, प्रा. दत्तात्रय भालेराव, शिवाजी राजगुरू, रोहित जगताप, अमर जगताप, किरण सुवर्णा, मनोहर कानडे, शहाजी मासुळकर त्याचप्रमाणे म्हाडाच्या अधिकारी वर्ग सह संत तुकाराम नगर मधील हजारो नागरिक उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version