Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘ विद्यालयाविषयी कृतज्ञताभाव जपणे हाच मोलाचा संस्कार आहे. याच भावनेतून समाजाला दिशा देण्याचे अनमोल कार्य घडत आहे.’ असे प्रतिपादन सासवड मधील बाल संस्कार वर्गांचे संचालक आणि ज्येष्ठ वास्तुशास्त्रज्ञ संजय रोकडे यांनी केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सासवड येथील वाघिरे विद्यालयाच्या मार्च १९८८ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मिळून उभारलेल्या निधीतून विद्यालयात शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा नववा सत्कार सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
व्यासपीठावर वाघिरे विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका सुषमा न्हालवे, सिरम इन्स्टिट्यूटचे वंदन वढणे आणि बांधकाम व्यावसायिक मुकुंद शेवते या मान्यवरांची उपस्थिती होती.
शारदामातेचे पूजन करून आणि राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. ज्येष्ठ कवयित्री आणि लेखिका माधुरी भोंगळे -विधाटे यांनी प्रास्ताविकातून या माजी विद्यार्थी संकल्पनिधीतून साकारणाऱ्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

मार्च २०२४ शालांत परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमातील मुलींमध्ये प्रथम श्रुती संदीप मेमाणे, मुलांमध्ये प्रथम अवनीश अजित बाचल आणि मराठी माध्यमातील मुलींमध्ये प्रथम रागिणी लक्ष्मण जैनक, मुलांमध्ये प्रथम श्रेयस विष्णू सावळे तसेच स्वर्गीय गोळे सर गणित शिष्यवृत्ती अपेक्षा संतोष सूर्यवंशी आणि श्रेया गणेश वढणे यांना प्रदान करण्यात आली. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
तसेच माजी विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या पाल्यांच्या सत्कार समारंभात डॉ. प्रितेश शिवाजी विधाटे, डॉ. ऋत्विक प्रमोद जगताप, डॉ. तेजस संदीप अकोलकर, डॉ.पार्थ चंद्रवदन वढणे आणि डॉ. सिद्धी शैलेंद्र धारवाडकर, प्रतीक प्रमोद मारणे, शुभम नितीन मुळे, ओम गणेश डांगरे, श्रद्धा संजय दिवसे यांचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी डॉ. वैशाली कांबळी, पोलीस इन्स्पेक्टर दिपाली राऊत-भुजबळ, उमेश पुरंदरे, शैलेश घंटे, गंगाराम टिळक या माजी विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संयोजन मिलिंद गुजर, प्रमोद जगताप, मंगेश जांभळे, रोहिणी भोंगळे, नितीन मुळे, रणजीत निरगुडे, सुभाष बोरकर, बाबा पानसरे, विशाल गवळी, योगेश अहेर, अरविंद धंदल, संदीप दळवी, अनुराधा बोरावके, अंजली टिळेकर, यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version