Spread the love

 

‘सोसायटीच्या उत्कर्षासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार’ – दीपक मोढवे – पाटील

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डीतील जय गणेश व्हिजन या प्रशस्त आणि प्रतिष्ठीत हाउसिंग सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे – पाटील यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे.

सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकमताने त्यांच्या चेअरमनपदी नियुक्तीचा ठराव संमत करण्यात आला. सोसायटीच्या सचिवपदी उमेश नामदे तर खजिनदारपदी बाबासाहेब बांगर यांची निवड झाली आहे.

जय गणेश व्हिजन ए विंग प्रिमायसेस को-ऑप सोसायटीच्या नवीन व्यवस्थापकीय समितीच्या सभासदपदी अ‍ॅड. सरला निकाळे, संतोष काशीद, प्रदीप अग्रवाल, रवींद्र चौधरी, शांतीलाल आगरवाल, संतोष सुतार, बापूराव चोपडे, शैलेंद्र गायकवाड, मीना ठाकूर, सालार शहाबादी यांच्याही बिनविरोध निवडी झालेल्या आहेत. यावेळी सोसायटीच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन आणि त्यांचा सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित चेअरमन दीपक मोढवे – पाटील यांनी निवडीबद्दल उपस्थितांचे आभार मानले. तसेच सोसायटीतील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही दिली. सोसायटीच्या उत्कर्षासाठी कायम प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी सोसायटीतील सभासदांना दिले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version