Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने दापोडी येथील शहिद भगतसिंग व भारत छोडो आंदोलनात पुण्यातील १६ वर्षीय पहिले हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या पूतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल, तानजी काटे, राजाराम भोंडवे, संदेश नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, प्रदेश युवक काँग्रेस सचिव व राष्ट्रीय प्रवक्ते गौरव चौधरी, सेवादल अध्यक्ष प्रा. किरण खाजेकर, शहर उपाध्यक्ष मेहबूब शेख, शहर सरचिटणीस वसंत वावरे, रवींद्र कांबळे, सचिन गायकवाड, शहर सचिव मिलिंद फडतरे, योगेश बहिरट, धनाजी गावडे, चंद्रकांत काटे, नितीन कांबळे, अरुणा वानखेडे, कुंदन कसबे, प्रकाश लोंढे आदींसह या बैठकीस शहर काँग्रेस मधील आजी-माजी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version