Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्ट वतीने ललित म्हसेकर यांची परीक्षक पदी निवड करण्यात आली. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रसाने, कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, अमोल केदारी, अक्षय गोडसे, महेश खोलप,सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, बाबसाहेब ढमाले, जगदीश शेट्टी, संतोष ढोरे, राजाभाऊ गोलांडे, कैलाश भांबुर्डेकर, अनिल वाघिरे, दत्तात्रय भोंडवे, नंदकुमार सुर्यवंशी, पोपट रसाने इत्यादी पदाधिकारी व ज्येष्ठ नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ललित म्हसेकर यांची पिंपरी चिंचवड शहरामधील गणेश मंडळांबरोबर असणारा दांडगा संपर्क पाहता तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट च्या योजना नागरिकांपर्यंत पोचून नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात मदतीचा हात देउन आधार देतात. तसेच ललित म्हसेकर यांची काम करण्याची पद्धत देखिल उत्कृष्ठ आहे, तसेच ललित म्हसेकर हे उच्चशिक्षित  इंजिनियर असून एका खाजगी आयटी कंपनी मध्ये कार्यरत असून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून स्वर्गवासी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे कट्टर समर्थक म्हणून नागरिकांमध्ये यांची ओळख आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version