Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या वतीने वकील बार रूम लोकशाहीर सहित्यरत्न व मराठी भाषेला जागतिक स्तरावर सन्मान मिळून देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.

या वेळी माजी अध्यक्ष ॲड.नारायण (नाना) रसाळ, ॲड. सुदाम साने, ॲड.जे.के काळभोर, ॲड.अमोल लक्ष्मण खांडेकर, ॲड.अरुण (मामा) खरात, ॲड.बी.के कांबळे,ॲड. नारायण थोरात, ॲड.संगीता कुशलकर,ॲड.पूनम शर्मा,ॲड.सागर अडागळे,ॲड.मंगेश नढे इ.वकील मान्यवारांनी यांनी आण्णाभाऊ साठे कार्याबद्दल व त्यांचे विचार या संदर्भात माहिती दिली तसेच यावेळी साहित्यारत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न देण्यात यावा याची उपस्थित वकील मान्यवरांकडून मागणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, महिला सचिव ॲड.वर्षा तिडके, सदस्य ॲड.जयेश वाकचौरे, ॲड.साक्षी धुमाळ, ॲड.तेजश चवरे, ॲड.विशाल पौळ यांच्याकडून करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version