Spread the love

 

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – विश्रांतवाडी येथे कार्यरत समाज कल्याण आयुक्तालय सेल्फी पॉइंट आहे का? कि सामाजिक प्रश्न, समस्या व इत्यादी तक्रार निवारण करण्याकरिता स्थापन झालेले आयुक्तालय? आहे का अशी तक्रार जिल्हा दक्षता समितीचे सदस्य ॲड.सागर चरण यांनी मुख्यमंत्री व समाज कल्याण आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अनेक गरजू, गरीब वर्ग आपल्या समस्या, योजना, शिष्यवृत्ती व इत्यादी समस्या निवारण करण्याकरिता समाज कल्याण आयुक्तालय विश्रांतवाडी पुणे येथे येतात.

तथापि, विश्रांतवाडी येथे कार्यरत समाज कल्याण आयुक्तालय सध्या (आय लव समाज कल्यान) सेल्फी पॉइंट करण्यात आल्यामुळे सदर कार्यालय शासकीय कार्यालय आहे की सेल्फी पॉईंट? शासनाने समाजाच्या विकासासाठी दिलेल्या निधीचा गैरवापर करून विनाकारण खर्च करण्याचा अधिकार कोणालाही देण्यात आलेला नाही. तसेच, असे करून शासकीय कार्यालयीन नैतिकतेचा गैरवापर होत असून समाजाच्या विकासासाठी असलेले पैसे याचा विनाकारण (वायफळ पैसे) खर्च करण्याचे अधिकार यांना कोणी दिले आणि असे खर्च करण्याची आवश्यकता आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

सदर घटनेची योग्य ती तपासणी करून समाजाच्या विकासच्या दृष्टीकोनातून असे विनाकारण (वायफळ पैसे) खर्च करण्याची आवश्यकता नाही आणि शासकीय कार्यालयीन नैतिकतेचा जपण्यासाठी हा (आय लव समाज कल्याण) सेल्फी पॉइंट तात्काळ हटवावा असे ही निवेदनात म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version