Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपळे सौदागर येथील कुंदन इस्टेट सोसायटीत आज   शितल नाना काटे यांच्या  हस्ते सोलर पॅनल सिस्टीमचे उद्घाटन करण्यात आले.

पिंपळे सौदागर मधील मोठ्या सोसायट्या पैकी कुंदन इस्टेट सोसायटी एक आहे. येथे जवळपास १७० सदनिका आहेत या सोलर इनर्जी नार्फ ८किलो vat वीज निर्मीत केली जाणार आसुन. त्यामुळे सोसायटीला येणाऱ्या महावितरणच्या बिलामध्ये बऱ्याच प्रमाणात बचत होऊन रहिवाश्यांची आर्थिक बचत होणार आहे. हे सोलर सिस्टीम बसविण्याचे काम अदानी सोलर पावर तर्फे मे.नेचर लाईल इनर्जी सोल्युशन्स या कंपनीमार्फत करण्यात आले.

यावेळी कुंदन इस्टेट सोसायटीचे कमिटी मेंबर चेअरमन रिशी पाटील, श्री. डोईजड, श्री. नायर, श्री. बंडेवार, श्री. कामदे, सौ. प्रिती मॅडम, श्री. रावत अंकल, सौ. गावडे मॅडम, सौ. पाटील मॅडम, व सोसायटीचे सदस्य रहिवासी  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version