Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  निगडीतील (सेक्टर २२) एसआरए प्रकल्पाच्या नावाखाली
बांधकाम व्यावसायिक काही स्थानिक गुंडांना हाताशी धरून जबरदस्तीने झोपड्यांचा ताबा
घेण्याचा प्रयत्न करत असल्याचाआरोप करत शहर भाजपाचे चिटणीस सचिन काळभोर यांनी आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. शनिवारी (दि. २०) निगडीतील अंकुश चौकात ठिय्या आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत काळभोर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून
निगडीतील सेक्टर २२ मधील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा विषय प्रलंबित होता. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे
यांनी मार्च महिन्यात परिसराचे सर्वेक्षण केले होते. येथील आझाद चौक झोपडपट्टी, श्रमिकनगर, संग्रामनगर, दळवीनगर या भागाचा त्यात समावेश होता. नागरिकांना एसआरए प्रकल्पांतर्गत इमारत
उभारणी करून १पॉश आणि बिल्डर जबरदस्तीने
झोपड्यांवर ताबा घेत असल्याचा आरोप मोठ्या आकाराच्या सदनिका देण्याचे आमिष बिल्डरने दाखविले होते. त्यामुळे नागरिकांनी स्वखुशीने झोपड्या प्रशासनाच्या ताब्यात देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, आता केवळ तीनशे स्केअर फुटाच्या सदनिका लाभार्थ्यांच्या
माथी मारण्यात येणार असल्याने नागरिक संभ्रमात सापडले आहेत. तर, दुसरीकडे एसआरए प्रकल्पासाठी गुंडांच्या माध्यमातून
येथील लाभार्थ्यांना धमकावले जात आहे. संमतीपत्रावर त्यांच्या बळजबरीने स्वाक्षरी घेतल्या जात आहेत. याबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी नागरिकांशी चर्चा
केलेली नाही. त्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याने नागरिकांची दिशाभूल होत आहे. याशिवाय या प्रकल्पात पन्नास झोपडपट्ट्या बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे,
असे प्रसिध्दीपत्रकात काळभोर यांनी म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version