Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढी एकादशीनिमित्त जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त सांगवीतून काढलेल्या दिंडीने सांगवी परिसर विठ्ठलमय झाला. टाळ, मृदुंग, ढोल, ताशांचा गजर व विठुरायाच्या नामघोषात बाल वारकरी तल्लीन झाले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण, भक्तिगीते, हरिपाठ, अभंग सादर केले. तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात ‘पाऊले चालती.. पंढरीची वाट’, असे म्हणत विद्यार्थ्यांनी दिंडीचा अनुभव घेतला.
संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाल वारकऱ्यांसोबत या वारीत संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवरच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, प्रिती पाटील, शिक्षिका ज्योती मोरे, नीलम मेमाणे, प्रीती पितळे, हेमाली जगदाळे, स्वाती मोरे, निकिता अडसूळे, खुशबू तारळकर, देबजानी मुजुमदार, प्रियांका कोकरे, मीनल साकले, सुनिता ठाकूर, भटू शिंदे, उदय फडतरे, अक्षय नाईक, पालक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालखीची प्रतिकृती तयार करीत नृत्य, पारंपरिक फुगडया, रिंगण यांचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ‘पाऊले चालती.. पंढरीची वाट’, असे म्हणत वारीचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा केलेली होती. अनेक बालचमूंनी संतांच्या वेशभूषा परिधान करून दिंडीची शोभा वाढवली. दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण व टाळाच्या प्रात्यक्षिकातून फुगडी, ज्ञानेश्वरांची भिंत, विविध प्रात्यक्षिकातून संतांचे दर्शन, वारकरी फुगडी, तसेच अभंग सादर केले. यामध्ये शिक्षकही सहभागी झाले होते.

संस्थेच्या अध्यक्षा राव यांनी सांगितले, की सर्व मतभेद विसरून आपुलकीने एकत्र येण्याचे ठिकाण म्हणजे वारी. तर संस्थेचे सचिव प्रणव राव यांनी सांगितले, की व्यवस्थापन कौशल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वारी. यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही, म्हणून कोणताच अहंकार अंगी बाळगू नका, असे आवाहन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version