Spread the love

 

कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी मोरे पाटील चौक,मोईफाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वेळा अपघात होत आहे. अनेक नागरिकांना यात जीव गमवावे लागत आहे.वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुदळवाडी भागात वॉर्डन ची नेमणूक करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश यादव यांनी वाहतूक विभाग तळवडे चिखली यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक ठिकाणी आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून नवीन डी पी रस्ते करण्यासाठी काम सुरू आहेत

कुदळवाडी परिसरात मोठी बाजारपेठ आहेत त्यामुळे मोठी वर्दळ रस्त्यावर असते .वाहतूक कोंडी चा फटका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक,नोकरदार यांना होत आहे .

ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या ठिकाणी वार्डन ची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सर्व नागरिकांना वाहतूक विभाग तळवडे यांना केली आहे यावेळी नगरसेवक दिनेश यादव,सामाजिक कार्यकर्ते विशाल बालघरे, काका शेळके उपस्थित होते

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version