पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोनवणे वस्ती चिखली प्र. कं. १ येथे बांधलेल्या टाऊन हॉल या इमारतीस पिंपरी चिंचवड मनपाचे दिवंगत नगरसेवक तथा स्व. दत्तात्रय काका साने यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विजय जरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनवणे वस्ती येथे पिं चिं महानगरपालिका यांनी जो टाऊन हॉल बांधला आहे त्या टाऊन हॉलला पिं. चिं. दिवंगत नगरसेवक तसेच विरोधीपक्ष नेते स्व. दत्तात्रय (काका) साने यांचा नाव देऊन त्यांनी जे पिं चिं. महानगरपालिके साठी दिलेले योगदान, तसेच जी केलेली जनसेवा व कोरोना काळामध्ये केलेल्या बहुमुल्य मोलाचे काम हे चिखली करांसाठी व नागरिकांसाठी अविस्मरणीय आहे तरी या सर्व गोष्टीचा विचार करूण नागरिकांच्या मागणी वरून चिलली येथील जो बांधलेल्या टाऊन हॉल आहे त्याला दिवंगत स्व. दत्तात्रय (काका) साने असे नाव देण्यात यावे असे म्हटले आहे.
तसेच सदर नामांकण करण्याकरीता येणारा संपुर्ण खर्च हा आम्ही करण्यास तयार असुन, त्यानुसार सदर बाबत रितसर आदेश करावा असे निवेदनात म्हटले आहे.
