Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राज्यात विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. यात पिंपरी चिंचवड मधून अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भात उमेदवारी जाहीर केली आहे. अमित गोरखे यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

 

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. 2 जुलै उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यापार्श्वभूमीवर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवला आहे. त्यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे  यांचा समावेश होता. केंद्रीय नेतृत्वाकडून गोरखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अमित गोरखे यांना संधी मिळाल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असून पक्षाला आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे. विधानसभेचे दोन आणि विधानपरिषदेचे दोन असे भाजपचे चार आमदार गोरखे यांच्या रूपाने होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अशी गोरखे यांची ओळख आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version