Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोहन नगर येथे ई १० वी व १२ वी नंतर काय ? करिअर मार्गदर्शन शिबीर व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास प्रा.विजय नवले , अनुराधा गोरखे ,निवृत्त पोलिस इंस्पेक्टर  भगवान काळे ,बाल संस्कार वर्गाचे  रवींद्र टोळे ,ज्येष्ठ नागरीक  रमेश कोठारी ,व्यापारी  सदाशिव गोरड. बबनराव देव्काते (माज़ी सैनिक) संभाजी घाडगे (माज़ी सैनिक) इत्यादि उपस्थित होते.प्रा.विजय नवले यांनी विद्यार्थी यांना करिअर बाबत मार्गदर्शन केले.

याच बरोबर आर्टिफीसियल इंटेलिजेंस बाबत मार्गदर्शन केले तसेच विविध क्षेत्त्रातिल संधी बाबत माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रस्ताविकात गणेश लंगोटे यांनी सांगितले “गेल्या १० वर्षापासुन हा उपक्रम साततत्याने राबवित आहोत ,चांगले विद्यार्थी घडावे व त्यांना करिअर बाबत योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतुने हा उपक्रम राबविला जातो “. सुत्र संचालन शारदा मुंडे यांनी केले आभार प्रदर्शन शुभम् पिंपळे यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version