Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने जगदगुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत कै.मधुकर पवळे उड्डाणपूल, निगडी येथे करण्यात आले.

दरवर्षी कमिटी व सभासदांतर्फे पालखीचे पिंपरी – चिंचवड शहरात स्वागत करण्यात येते. यावेळी स्वागत केल्यानंतर सर्व दिंडी प्रमुख, विणेकरी, चोपदार आणि वारकऱ्यांना विद्यमान बार असोसिएशन तर्फे अल्पपोहाराचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने, माजी सचिव ॲड. भूषण चिंचवडे, विद्यमान सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, सदस्य ॲड. फारूख शेख,ॲड. दशरथ बावकर, ॲड. आयाज शेख, ॲड. अतुल नढे, ॲड. विकास शर्मा आदी उपस्थित होते.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version