Spread the love

 

प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार नॅशनलीस्ट ट्रेड युनियन फेडरेशन, असंघटित कामगार विभागाच्या महाराष्ट्र सरचिटणीस पदी तुषार घाटूळे यांची तर सोशल मीडिया सचिवपदी सुरज देशमाने यांची निवड मां.जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या शुभहस्ते व राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांचे उपस्थितीत
करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष असून कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे इथे कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. कामगारविषयी चांगले काम करत रहा अशा शुभेच्छा जयंतराव पाटील यांनी दिल्या.

तुषार घाटुळे व सुरज देशमुख हे सामाजिक आणि कामगार क्षेत्रामध्ये असून त्यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी तुषार घाटूळे म्हणाले की पक्षाने असंघटित कामगारांमध्ये काम करण्याची संधी दिलेली सार्थ ठरवून प्रदेशाध्यक्ष यांचे सोबत महाराष्ट्र राज्यातील कामगारांना एकत्र घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version