Spread the love

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना मध्ये दि. २१/०७/२०२४ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष राजन भानुशाली यांच्या मार्गदर्शना खाली व महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना प्रादेशिक सल्लागार पुणे संतोष सौंदणकर यांच्या संपर्क कार्यालयात इलेक्ट्रीसिटी लाईनस्टाप असोसिएशन पुणे झोन सचिव गणेश जाधव यांचा प्रवेश झाला.

यावेळी महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना केंद्रिय सहसचिव राजेश गाढवे, पुणे परिमंडळ अध्यक्ष मनोहर शिंदे, भोसरी विभागय सहसचिव कुमार जाबगौड उपस्थित होते.
माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे जन माणसात तयार झालेली प्रतिमा तसेच त्यांच्या कार्य शैलीवर मोहित होऊन संघटनेचे तसेच पक्षाचे काम करण्यासाठी तत्पर राहील असे आश्वासन सचिव गणेश जाधव यांनी दिले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version