Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंतरराष्ट्रीय योग दिननिनिमित्त नाना काटे सोशल फौंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक  हसन तफ्ती यांनी उपस्थिती लावत सर्वांना योगाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, चंद्रकांत तापकीर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खुळे, प्रशांत सपकाळ, सतिश डोंगरे, काळुराम कवितके, उमेश काटे, सुमित डोळस, जॉन डिसुझा, विशाल बोत्रे, विशाल काळे, सचिन देसाई, गौरव शितोळे,  शशांक खांडेकरश्रीमती निशा शुक्लाश्रीमंती उमा कुलकर्णी, रहाटणी पिंपळे सौदागर मधील आर्ट ऑफ लिव्हिंग चे सदस्य उपस्थित होते.

 आयोजित कार्यक्रमानिमित्त परिसरातील जेष्ठ नागरिक, माता भगिनीतरुण-तरुणीसोसायटी मधील नागरिकहॉली इंग्लिश मेडीयम स्कुल चे विद्यार्थी तसेच योगा प्रेमी यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत योग शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version