Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील गीता मंदिर प्राथमिक शाळेत आज शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.शाळेचे मुख्याध्यापक  महेंद्र भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे ,पालकांचे नवागताचे सहर्ष स्वागत केले.

विद्यार्थांचे औक्षण करून त्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.पेन, पेन्सिल अशा भेट वस्तू देण्यात आल्या.विद्यार्थी व पालक मोठ्या उत्साहाने, आनंदाने हजर होते. चंदा नामदे, संगिता शहासने, मंदा कोकरे, ज्योत्स्ना वाव्हळ, राजश्री गायकवाड, सुनिता धोंडगे सर्व शिक्षक कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version