Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये येत्या सोमवारी(दि.१० जून) सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर या कालावधीत जनसंवाद सभा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता आचारसंहिता संपुष्टात आली असल्याने या जनसंवाद सभा नियोजित दिवशी विहित वेळेत आयोजित केल्या जाणार आहेत, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे .

*जनता संपर्क अधिकारी*

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version