Spread the love

 

राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाकडून जल्लोष साजरा

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतातील लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल आज लागला यात महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा व संविधानाच्या बाजूने मतदान केले हि विधानसभेच्या विजयाची नांदी आहे असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट युनियन फेडरेशन व असंघटित कामगार विभागाच्या वतीने आज चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे महाविकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष लाडू वाटप करून, गुलाल उधळून करण्यात आला.

यावेळी प्रदेश सचिव तुषार घाटूळे,उपाध्यक्ष राजेश माने, युवा विभागाचे सुरज देशमाने,राजू बिराजदार, सामाजिक कार्यक्रम हौसराव शिंदे,बाळासाहेब बरगले,शिवसेनेचे शिवाजी साळवे,नाना कसबे, बालाजी लोखंडे,नाना क्षीरसागर,तुकाराम माने,फरीद शेख,मनोज यादव,सलीम डांगे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र मध्ये पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी अनेक सभा घेतल्या महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचे पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस सोडून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला मात्र जनतेने त्यांना नाकारलेल आहे. रोजगाराच्या मुद्द्यावर, महागाईच्या मुद्द्यावर त्याचबरोबर फोडाफोडीचा राजकारणावर जनतेने दिलेले हे उत्तर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी ८४ व्या वर्षीही न खचता लढले त्याचा करिष्मा दिसून आला
शरद चंद्र पवार साहेब यांचा करिष्मा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी घेतलेल्या १०० पेक्षा अधिक सभा, कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व
महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मेहनत कामाला आली.

त्यांच्यावर विश्वास जनतेने दाखवला आहे.राज्यामध्ये महाविकास आघाडी भविष्यात विधानसभेला मोठे संपादन करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version