Spread the love

 

कासारवाडी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मेट्रोच्या नाशिक फाटा येथील रेल्वे स्टेशनचे भोसरी हे नाव बदलून नाशिक फाटा करा अशी मागणी डॉ. अशोक कुमार पगारिया यांनी महामेट्रो व्यवस्थापनाकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे महामेट्रोचे नाशिक फाटा येथील रेल्वे स्टेशनचे नाव चुकून भोसरी असे दिले गेले आहे. वास्तविक पाहता नाशिक फाटा या ठिकाणी असलेल्या मेट्रोच्या रेल्वे स्टेशन पासून भोसरी हे उपनगर पाच किलोमीटर दूर आहे, त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळ होत आहे.

गैरसमज होत आहे आणि नाशिक फाट्यावर बाहेरून येणारे प्रवासी यांना भोसरी मेट्रो स्टेशनवर उतरून भोसरीला पाच किलोमीटर लांब जावे लागत आहे!नासिक फाटा या ठिकाणी तीन प्रकारचे स्थानकावर तीन नावे दिली गेली आहेत. रेल्वे स्टेशनला कासारवाडी, बस स्टॉप ला नाशिक फाटा, आणि मेट्रो स्टेशनला भोसरी. यामुळे सर्वांचा गोंधळ होत आहे. त्यामुळे मेट्रो व्यवस्थापनाने भोसरी हे नाव बदलून नाशिक फाटा हे योग्य नाव आणि त्या ठिकाणचे नाव द्यावे .आणि या मेट्रो रेल्वे स्टेशनवर सर्व ठिकाणी नावात बदल करून “नाशिक फाटा’ हे नामकरण करावे असे पत्र रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरी या संस्थेच्या वतीने मेट्रो व्यवस्थापनाला त्यांच्या ईमेल वर पाठवले आहे .

मेट्रोचे अधिकारी  द्विवेदी साहेब यांच्याशीही रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष रो डॉअशोक कुमार पगारिया आणि विद्यमान अध्यक्ष रो ज्ञानेश्वर विधाटे यांनी चर्चा केली आहे. त्यांनी याबाबत वरिष्ठ व्यवस्थापनाला कळवून त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. या मेट्रो रेल्वे स्टेशनचे नाव बदलले नाही तर रोटरी क्लब ऑफ डायनामिक भोसरीच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल असेही डॉ अशोककुमार पगारिया यांनी पत्रात लिहिले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version