Spread the love

 

 

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात सावरकर जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन करण्यात आले. सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष परबती वाडकर यांच्या हस्ते सावरकर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी सिद्धिविनायक जेष्ठ नागरिक संघ, स्वा. सावरकर प्रतिष्ठान व स्वा. सावरकर मित्र मंडळाचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

विविध वक्त्यांनी सावरकरांचे जाज्वल्य देशप्रेम, ओजस्वी साहित्य, स्वातंत्र्यलढा, क्रांतीकारकांना मार्गदर्शन, सामाजिक संघटन आदी कार्याला उजाळा दिला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version