Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने लोणावळा सिंहगड इन्स्टिट्यूट येथे नवोदित वकील बंधू भगिनींसाठी चार दिवसीय दिं २३ ते २६ मे २०२४ पर्यंत निवासी अभ्यास शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, आज शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय माधव जामदार यांच्या हस्ते चार दिवसीय अभ्यास शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, प्रसंगी प्रमुख पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश माननीय महेंद्र महाजन उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड ॲड. बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सचिव ॲड. धनंजय कोकणे,  सचिव ॲड. निखिल बोडके, ॲड. मंगेश खराबे यांच्या वतीने  न्यायमूर्ती माधव जामदार साहेब, प्रमुख जिल्हा न्यायाधीश महाजन साहेब ,तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप सर यांचा सत्कार करण्यात आला ,सदर शिबिरात महाराष्ट्रभरातून अनेक नवोदित वकील बंधू भगिनी सहभाग नोंदविला आहे.या शिबिरात १ जुलै २०२४ पासून नव्याने लागू होणारे तीन कायदे त्यामध्ये भारतीय न्याय संहिता ,भारतीय नागरीक सुरक्षा ,भारतीय साक्ष अधिनियम या कायद्याची प्रमुख वक्त्यायांच्या वतीने नवोदितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या शिबिराचे आयोजन बार कोन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विधमान अध्यक्ष अँड राजेंद्र उमाप ,उपाध्यक्ष ॲड.उदय वारुंजीकर ,बार कोन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड.आशिष देशमुख, ॲड. संग्राम देसाई, ॲड.जयंत जायभावे यांच्यावतीने करण्यात आले होते, या शिबिरात बार कोन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे जवळपास सर्वच सदस्य त्यामध्ये उपस्थित होते.

ॲड. पारिजात पांडे,ॲड.हर्षद निंबाळकर,ॲड.सुभाष घाडगे,ॲड.विवेकानंद घाडगे,ॲड.मोतिसिंह मोहटा,ॲड.वसंत साळुंके,ॲड.सतीश देशमुख,ॲड.असिफ कुरेशी व इतर सदस्य उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version