Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अनधिकृत होर्डिंग्ज तत्काळ काढून टाकण्यात यावे. शहरातील होर्डिगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अनधिकृत असलेले लगेच काढून टाकण्यात यावेत अशी मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष  ॲड . संदीप चिंचवडे यांनी आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल घाटकोपर मुंबई येथे होर्डिंग कोसळून त्याखाली 8 लोक मृत्यूमुखी पडले आहेत.65लोक जखमी झाले. महानगरपालिकेने वेळीच सावध होऊन आपल्या शहरातील होर्डिग चे स्ट्रक्चरल ऑडिट करावे अनधिकृत असलेले लगेच काढून टाकण्यात यावेत जे अधिकृत आहेत त्याचे बाबत इंजिनीअर्स कडून खुलासे घ्यावेत आणि तरी सुद्धा दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करावी यापूर्वी ज्यांनी परवानग्या घेतल्या आहेत त्या पण पुन्हा नव्याने चौकशी करून अहवाल घेण्यात यावा.कुठल्याही एजन्सी ना हे काम न देता स्वतः मनपा चे अभियंता यांचे कडून अहवाल घेवून त्यावर कार्यवाही व्हावी.भविष्यात अशा दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ नये नुकसान होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.नव्याने व तत्काळ होर्डिंग्ज पॉलिसी करण्यात यावी.

अनधिकृत होर्डिंग्ज टाकणाऱ्या एजन्सी आणि त्याचे उभारणीचे काम करणारे ठेकेदार आणि त्या भागातील जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, असे ही निवेदनात म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version