Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी कॅम्प येथील सावली निवारा केंद्र या निराधारांचे पालन – पोषण आणि उपचार – संगोपन करणाऱ्या संस्थेला पिंपरी चिंचवड काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून आवश्यक वस्तूंची मदत करत सेवा कार्य करण्यात आले.

मानवतेला साजेसे आणि मानवी जीवनाचे एक वेगळे रूप या ठिकाणी अनुभवायला मिळाले अतिशय सुंदर, संवेदनशील, सहृदय असे काम या ठिकाणी संस्थेचे संचालक मा. हुसैनि  यांच्याकडून आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केले जात आहे.
रस्त्यावर किंवा समाजात इतरत्र निराधार बेवारस अवस्थेत आजारपणात पडून असलेल्या माणसांना या ठिकाणी आणून त्यांची सेवा संगोपन उपचार केले जातात. या अशा उल्लेखनीय कार्याला हातभार लावला गेल्याबद्दल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि आसाम राज्याचे काँग्रेस पक्षाचे सह प्रभारी मा. श्री.पृथ्वीराज साठे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम केला गेला.

या ठिकाणी या सर्व संस्थेतील माणसांना उपयोगी पडेल असे साहित्य पिठाची चक्की यंत्र देत सेवाकार्य करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव गौतम आरकडे, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे,महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, माजी नगरसेवक बाबू नायर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरवदे, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, जितेंद्र छाबडा आधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पृथ्वीराज साठे मित्र परिवार पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड काँग्रेसचे पदाधिकारी, आघाडी संघटनांच्या प्रमुखांकडून करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version