Spread the love

 

खोपोली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शनिवारी उरण, कर्जत, खालापूर तालुक्यातील ग्रामीण भागात काही गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला. रात्री खोपोली शहरात काढण्यात आलेल्या प्रचार फेरीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कर्जत-खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे, उरणचे आमदार महेश बालदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय म्हसुरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी ठिकठिकाणी प्रचार फेरीत सहभागी झाले होते.

खासदार बारणे यांनी उरण खालापूर विधानसभेतील वावर्ले, बोरगाव, कोयना, भिलवले, वेणेगाव, कलोते, चौक फाटा, चौक शहर, तुपगाव, लोहोप, माझगाव, वाणीवली, तळवळी, मोहपाडा आदी गावांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळी व महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

खोपोली शहरात संध्याकाळी प्रचार फेरी व बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार फेरीला सुरुवात झाली.‌ बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. शहराच्या विविध भागांमध्ये फटाके वाजवून व औक्षण करून बारणे यांचे स्वागत करण्यात आले. खोपोली व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित सभेत बारणे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version