Spread the love

 

शाळेत जाऊन शिक्षकांचा केला यथोचित गौरव

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने पी.एम. स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया “पीएमश्री” योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव येथील माध्यमिक विद्यालयाची निवड करण्यात आली आहे. या योजनेत निवड झालेल्या शाळांच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच केंद्राच्या सहकार्याने दर्जेदार शिक्षणासाठी आदर्श शाळा विकसित करण्यात येणार आहेत. केंद्राच्या योजनेत आपल्या महापालिकेच्या एखाद्या शाळेची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्या पिंपरी-चिंचवड शहरासाठी ही निश्चितच अभिनंदनाची बाब आहे. त्यामुळे आज या शाळेला भेट देऊन मुख्याध्यापक  बाळासाहेब राठोड  आणि सन्माननीय शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा यथोचित गौरव केला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version