Spread the love

 


चिंचवड,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ.पौर्णिमा कदम, प्रा. पांडुरंग इंगळे, डॉ. श्रुती गणपुले, डॉ. रुपा शहा, डॉ. आनंद लुंकड समवेत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा.रोहित अकोलकर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून सामुदायिक शपथ उपस्थिताना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. महिमा सिंग, ग्रंथपाल मीना डोंगरे यांनी केले. विविध मान्यवरांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. विशेष सहकार्य सहाय्यक ग्रंथपाल सचिन गायकवाड सीमा इंगळे आदींनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version