Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने एक वही एक पेन संकलन व रोपे वाटप असा अनोखा उपक्रम राबविला. रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, राज्य समन्वयक श्वेता साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांच्या हस्ते भीमसृष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.

या उपक्रमात अनेक अनुयायांनी सहभाग दर्शवत संस्थेकडे वही पेन सुपूर्द करत अभिवादन केले. या उपक्रमात सहभागी होणार्‍या नागरिकांना रोप वाटप करत सन्मान करण्यात आला या उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी उपस्थिती लावून उपक्रमास सदिच्छा व्यक्त केल्या.

रयत विद्यार्थी विचार मंच संस्था दरवर्षी हा उपक्रम राबवत असते या उपक्रमाच्या माध्यमातून जमा होणारे शैक्षणिक साहित्य शहरातील गरीब गरजू विद्यार्थी तसेच इतर ठिकाणच्या आश्रम शाळा यांना हे साहित्य पुरवले जाते.

या उपक्रमासाठी प्रदेश महासचिव संतोष शिंदे, शहराध्यक्ष अभिषेक चक्रनारायण, भाग्यश्री आखाडे, माधवी खरात, योगेश कांबळे, अजय चक्रनारायण, अतुल वाघमारे, विक्रांत शेळके, अभिजित लगाडे, प्रणाली कावरे, सिद्धार्थ सूर्यवंशी व इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version