Spread the love

 

 पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती नेहरूनगर येथिल कोर्टात उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश  व्ही.एन. गायकवाड ,   निवृत्त न्यायाधीश   बी.एन. वाघ साहेब, कार्यक्रमाचे अध्यक्ष  ॲड.सुनिल कडुसकर, माजी अध्यक्ष ॲड.नाना रसाळ, अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, महिला सचिव ॲड. वर्षा तिडके यांचे हस्ते पुष्पहार अर्पण  करून आला तसेच यावेळी भारतीय राज्यघटनेच्या प्रतींचे वाटप करण्यात आले.  यावेळी जेष्ठ ॲड.बी.के.कांबळे,ॲड.अरुण खरात मामा, ॲड.पि.एस.कांबळे ॲड.संभाजी बवळे, ॲड.संभाजी वाघमारे, ॲड.सुनील माने,ॲड‌. नारायण थोरात,ॲड. राज जाधव, यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासावर व्याख्यान देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड.मुकुंद ओव्हाळ, ॲड.नितीन कांबळे, ॲड‌.सागर अडागळे, ॲड.वाळके, ॲड.प्रविण जगताप,ॲड.मिलिंद कांबळे, ॲड.श्रीराम गालफाडे, सदस्य ॲड.जयेश वाघचौरे, ॲड.सुर्यकांत शिंदे,ॲड. प्रशांत बचुटे,ॲड. एश्वर्या  शिरसाठ आदी वकील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन असोसिएशन चे सदस्य ॲड. विशाल पौळ यांनी केले व आभार प्रदर्शन ॲड.तेजस चवरे यांनी केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version