Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ बाबासाहेब आंबेकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त बुद्धराष्ट्र तरुण मित्र मंडळ राजीव गांधी नगर यांच्या वतीने व भाजपा शहराध्यक्ष मा.श्री शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतीक भवन पिंपळे गुरव येथे “ऒंकार मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, पिंपळे गुरव यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच नागरीकांना पुर्णपणे मोफत डायलिसीस उपक्रम राबविण्यात आला. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकऱ्यांना पुर्णपणे मोफत सेवा देण्यात आली. या वेळेस, हॉस्पीटलचे सर्वेसर्वा श्री. विजय खर्चे डॉ.देवयानी लोंढे , डॉ अमोल शेंडे, सोमनाथ बोडरे, व हॉस्पीटल स्टाफ तसेच मंडळातील कार्यकर्ते श्री. राघू साबळे – संजय गायकवाड, अनंत सरवदे, तानाजी पायाळ, सतिश कोल्हे, देवानंद ओव्हाळ, शुध्दोधन डोंगरदिवे, आकाश हावळे इत्यादी कार्यकर्ते व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रविण मोतीराम कांबळे यांनी केले तसेच कार्यक्रमाला विशेष सहकार्य भाजपा सांगवी रहाटणी मंडल उपाध्यक्ष ललित म्हसेकर यांनी केले.व भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ललित म्हसेकर यांनी सर्व नागरीकांना संविधाना विषयी महत्त्व समजून सांगीतले*

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version