Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते आणि तीन वेळ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील अखेर ‘धनुष्यबाण’ खाली ठेवून ‘घड्याळ’ हाती बांधणार आहेत. शिवसेनेला रामराम ठोकून आढळराव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. केवळ समायोजन किंवा तडजोड म्हणून महायुतीतील घटकपक्षांमध्ये हे पक्षांतर होत असल्याची माहिती आहे.

शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंगळवार २६ मार्च रोजी राष्ट्रवादीत प्रवेशाचा मुहूर्त निघाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे अशी लढत निश्चित मानली जात आहे.

मला काय, माझ्या जनतेला विजयाची १०० टक्के खात्री आहे. माझं जे कॅलक्युलेशन आहे, आजपर्यंत मी ज्या निवडणुका जिंकलो आहे, काही नसताना पहिली निवडणूक ३० हजार मतांनी जिंकलो होतो दुसरी लोकसभा निवडणूक १ लाख ८० हजारांच्या मताधिक्याने, तर तिसरी निवडणूक ३ लाख ३ हजारांनी जिंकलो होतो. चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडेल अशी अपेक्षा आढळरावांनी व्यक्त केली.       “२०१९ चा बदला घेणार का?” या प्रश्नावरही “त्यासाठीच उभा राहणार आहे” अशी प्रतिक्रिया आढळरावांनी दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version