Spread the love

चिंचवड ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे शाखेच्या वतीने औद्योगिक सुरक्षा स्पर्धा 2024 चे आयोजन भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे आयोजित करण्यात आले. या स्पधेत विविध औद्योगिक भागातील सुमारे 35 कंपन्यातील 501 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन एस.के.एफ. कंपनीचे सेफ्टीहेड राहुल बोकील, थरमॅक्स इंडिया लि. पॉवर डिव्हीजनचे बिझनेस एक्सलन्स हेड गौरव शर्मा यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. फोरमच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर व ईतर सदस्य डॉ. अजय फुलंबरकर, माधव बोरवणकर, अनंत क्षीरसागर यावेळी उपस्थित होते.
या स्पधेत 61 केस स्टडीज, 25 स्किट, 90 पोस्टर्स, 60 श्लोगन यांचा समावेश होता. एकूण 236 जणांना नामांकन प्राप्त झाले.

स्पर्धेच्या समारोप सत्रात प्रमुख पाहुणे कोथरुड येथील कमिन्स इंडिया लि., प्लाँटचे सेफ्टीहेड विजय हिरेमठ, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर, माधव बोरवणकर, संजीव शिंदे, डॉ. अजय फुलंबरकर, भूपेश मॉल व परिक्षकांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदक प्रदान केले.

कार्यक्रमाचे आयोजन  प्रशांत बोराटे व चंद्रशेखर रुमाले यांनी तर सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version