Spread the love

 

– कल्‍याणकारी महामंडळासाठी पाठपुरावा केल्‍याबद्दल व्‍यक्‍त केली कृतज्ञता

– रिक्षा चालक, कष्टकऱ्यांना न्‍याय देणे हे माझे कर्तव्‍य : बाबा कांबळे

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विविध आंदोलने, निवेदने देऊन रिक्षा चालकांच्‍या कल्‍याणकारी मंडळासाठी पाठपुरावा करत यश मिळवून दिले. याबद्दल ऑटो, टॅक्सी, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे व महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक बाबा कांबळे यांचा पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील चालक मालकांनी सन्‍मान केला. पिंपरी येथील बाबा कांबळे यांच्‍या कार्यालयात भेट घेऊन हा सन्‍मान करण्यात येत आहे रिक्षा चालकांसाठी केलेल्‍या कामाप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त केली. या सन्‍मानाला उत्‍तर देताना बाबा कांबळे म्‍हणाले की, सर्वसामान्‍य कष्टकरी, रिक्षा चालकांच्‍या न्‍याय हक्‍कासाठी आयुष्य समर्पित केले आहे. त्‍यामुळे कल्‍याणकारी मंडळासाठी झालेला निर्णय हे माझ्या लढ्याचे यश असले तरी त्‍यासाठी पाठपुरावा करणे हे माझे कर्तव्‍य असल्‍याचे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी व्‍यक्‍त केले.

या वेळी. लोणावळा येथील वरिष्ठ नेते बाबुभाई शेख लोणावळा शहराध्यक्ष आनंद सदावर्ते परीक्षा चालका उपस्‍िथत होते.

रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी बाबा कांबळे यांच्‍या नेतृत्‍त्‍वात सातत्‍याने पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्‍या भेटी घेऊन निवेदनाद्वारे पाठपुरावा केला आहे. प्रत्‍यक्ष भेट घेऊन कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी केली होती. या पाठपुराव्‍याला आणि मागणीला यश आले आहे. राज्‍य सरकारने संघटनेला दिलेला शब्द पाळत कल्‍याणकारी मंडळ स्‍थापन करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. त्‍याचा पहिला भाग म्‍हणून मंडळ स्‍थापन करण्यासाठी तब्‍बल ५० कोटी रुपये निधी देखील मंजूर केला आहे. या निर्णयामुळे राज्‍यातील २० लाख ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांच्‍या आनंदात भर पडली आहे. यासाठी पाठपुरावा करून यश मिळवून दिल्‍याबद्दल पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरसह जिल्‍ह्यातील रिक्षा चालकांनी बाबा कांबळे यांचे आभार मानले आहेत. कांबळे यांच्‍या पिंपरी येथील कार्यालयात भेटण्यासाठी रिक्षा चालक गर्दी करत आहेत. तसेच बाबा कांबळे यांचा सन्‍मान करण्यात आला.

या सत्‍काराला उत्‍तर देताना बाबा कांबळे म्‍हणाले की, रिक्षा चालकांच्‍या सत्‍कारातून आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते. रिक्षा चालकांच्‍या पाठिंब्यामुळे कल्‍याणकारी मंडळ स्‍थापन करण्याची दखल राज्‍य सरकारला घ्यावी लागली. येथून पुढेही ज्‍या मागण्या प्रलंबित आहेत. त्‍याला न्‍याय देण्यासाठी लढणार आहे. रिक्षा चालकांना हक्‍क मिळवून देण्यासाठी लढणे हे माझे कर्तव्‍य असल्‍याचे बाबा कांबळे म्‍हणाले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version