Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  डायमंड जैन सोशल ग्रुपने आपल्या सभासदांसाठी महाविद्यालयीन जीवनाचा अनुभव घेण्यासाठी बॅक टू कॉलेज या थीमवर “दिल दोस्ती दुनियादारी” हा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयामध्ये मध्ये घेण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठेवण्यात आले होते. सुरुवातीला सर्व सभासदांसाठी बाईक रॅली चे आयोजन केले होते. त्यामध्ये गोग्रास, एज्युकोन ,हरित पर्यावरण आणि प्रदूषण मुक्ती याविषयीची जागृती करण्यात आली. महाविद्यालयात आल्यावर सर्वांचे ओरिएंटेशन अध्यक्ष   प्रशांत गांधी आणि कार्यक्रम अधिकारी सुनील शहा, व नीरज शाह यांनी केले. त्यानंतर स्पोर्ट्स इव्हेंट, विविध क्लास ऍक्टिव्हिटीज ज्यामध्ये व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, एक्झामिनेशन ,डिबेट कॉम्पिटिशन, कॅन्टीन व कॉलेज कट्टा हे प्रसंग नाट्यपूर्ण रित्या सर्व टीम मधील सभासदांनी करणे अपेक्षित होते. व त्याचा व्हिडिओ बनवणे अपेक्षित होते. अत्यंत उत्साहाने प्रत्येकाने यात सहभाग घेवून पुन्हा ते आयुष्य आठवले. त्यानंतर फ्रेशर्स पार्टी ज्यामधून मिस्टर अँड मिस फ्रेशर यांची निवड करण्यात आली, राहुल कर्नावत वंदना कुवाड यांनी हा मान पटकावला. यानंतर महाविद्यालयाचे आकर्षण असलेले इलेक्शनचे वातावरण तयार करण्यात आले होते. सर्व उमेदवारांनी आपला दोन मिनिट प्रचार केला व त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने वोटिंग घेण्यात आले. निवडणुकीचा निकाल लगेचच स्क्रीनवर दाखवण्यात आला. अत्यंत निरपेक्ष पद्धतीने घेण्यात आलेल्या निवडणुकांचे लोकांनी कौतुक केले.

धिरेन शहा व मनीषा जैन हे अनुक्रमे जनरल सेक्रेटरी व लेडी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून आले. त्यानंतर जनरल नॉलेज च्या आधारावर क्विझ घेण्यात आली. सर्व ऍक्टिव्हिटीच्या स्कोर वरून एक डायमंड जनरल चॅम्पियनशिपची ट्रॉफी एस वाय बी च्या क्लास ने मिळवली. ज्याची मेंटरशिप सिद्धार्थ शहा व कमलेश चोपडा यांच्याकडे होती. स्वादिष्ट जेवणानंतर कार्यक्रमाची समाप्ती झाली. सर्व कमिटी मेंबर्स सर्व कार्यकारी सभासद, मेंबरच्या उत्तम सहभागामुळे कार्यक्रम दीर्घकाळ लोकांच्या लक्षात राहील.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version