Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपा महिला मोर्चा व ईशा नेत्रालय चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा सन्मान तसेच अत्याधुनिक मशीनद्वारे व तज्ञ  डॉक्टरांद्वारे मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . शिबिरामध्ये अत्याआधुनिक मशीन व तज्ञ डॉक्टरांच्या द्वारे डोळे तपासणी , तसेच सहभागी सर्व महिलांना विशेष भेटवस्तू देण्यात आल्या व अल्पपोहाराचेही नियोजन करण्यात आले होते . विशेष लकी ड्रॉ मार्फत प्रथम व द्वितीय बक्षीस पैठणी देण्यात आली.

महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव    मधुकर बच्चे यांनी शिबिराचे प्रास्तविक केले.   डोळे तपासणी महत्व व या शिबिरातून लोकांना मिळणारे फायदे आदी मनोगत  व्यक्त केले.
सेंटर हेड,मोतीबिंदू तज्ञ व रोटीना तज्ञ डॉ. वैभव अवताडे यांच्या हस्ते सकाळी 10 वा शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

या वेळी सुरेश भोईर, राजेंद्र गावडे ,अश्विनी चिंचवडे ,भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा  सुजाता पालांडे महिला मोर्चाच्या माजी  अध्यक्षा उज्वला गावडे , भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे,ईशा हॉस्पिटलचे गणेश कांबळे, गिरीश हंपेभाजपा माजी प्रभाग आध्यक्षा रोहिणी बच्चे ,महिला मोर्चा उपाध्यक्ष दिपाली  कलापुरे , काजल बच्चे – गावडे, महिला मोर्चा सरचिटणीस प्रतिभा जांभुळकर, महिला मोर्चा चिटणीस पल्लवीताई मारकड, महिला मोर्चा चिटणीस वैशाली वाखारे ,बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका सीमा चव्हाण ,महाराष्ट्र राज्य उद्योग आघाडी उपाध्यक्ष  नीता कुशारे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीषा शिंदे,सामाजीक नेत्या सुषमा वैदय ,गणेश बच्चे. आदी भाजपा व सामाजिक  मान्यवरांनी शिबिरास उपस्थिती दिली.

ईशा हॉस्पिटलच्या वतीने गणेश कांबळे(मार्केटिंग हेड) जीवन पऱ्हाड(सीनिअर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह) प्राची इनामदार(कौन्सेलर हेड)
शिवानी शिंदे, प्रथमेश निंबाळकर भाजपा महिला मोर्चा शहर सचिव  पल्लवी पाठक यांनी सर्वाचे आभार मानले. कार्यक्रमाला जवळपास 200 पेक्षा जास्त महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात महिलांसाठी खास लक्की ड्रॉ काढण्यात आला त्यात प्रथम बक्षीस पैठणी दीपाली कलापुरे यांना तर द्वितीय बक्षीस खण साडी , रूपाली महाजन यांना मिळाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version