Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेविका निर्मला कुटे, समाज प्रबोधनकार महानंदा डाळिंबे, शिवसेना उपनेत्या अनिता तुतारे, सुनिता चाबुकस्वार,सामाजिक कार्यकर्त्या शोभा जगताप, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संदीप चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिंनगारे, शाळेच्या मुख्याध्यापिका नाजनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे,  जिजाऊ माॅसाहेब,सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेतर्फे गेली दहा ते बारा वर्षांपासून महिलांची जनजागृती, सक्षमीकरण तसेच समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार होतो. त्याद्वारे ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ म्हणून समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला डॉ.वर्षा जाधव, (आयसीयू असिस्टंट आदित्य बिर्ला हॉस्पिटल), डाॅ. सोनाली कटके, (सहाय्यक फिजिशियन, ज्युपिटर हॉस्पिटल), डॉ. लीना तुडयेकर (शाश्वत हॉस्पिटल औंध) ऍड.शुभांगी भालेराव, ऍड. सीमा शर्मा,,सी.ए.रूपाली घोलप शाळेच्या माजी मुख्याध्यापिका मोनिका सिंग,  कीर्तनकार प्रिया काटे, पत्रकार लीना माने, सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी  तापकीर सुनिता पवार, सुजाता नखाते ,मंदा पगारे, विना कांबळे, कल्पना हालू, सोनाली जगताप, शोभा भालेराव, लायन्स क्लबच्या इंदू सूर्यवंशी आणि अंजुमन सय्यद तसेच शाळेच्या महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा संविधान प्रतिमा व गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
महानंदा डाळिंबे यांचा एकपात्री “क्रांतीज्योती मी सावित्री बोलते” सावित्रीबाईंच्या जीवनावर समाज प्रबोधन केले. सोनाली पाटील यांनी आपल्या भाषणातून मातृत्व हे परमेश्वराने स्त्रीला दिलेले एक अतुलनीय वरदान आहे. एखादी स्त्री आई झाली तर तिची जबाबदारी निश्चितच वाढते. एक म्हणजे घरचे काम व बाळाचे संगोपन अशी दुहेरी जबाबदारी नोकरदार स्त्रियांसाठी नोकरी, घरचे काम वबाळाचे संगोपन अशी तिहेरी जबाबदारी. त्यामुळे ती स्वतःसाठी वेळी देऊ शकत नाही. “ज्या घरात मुली असतात ते घर सुख, समृद्धी व भरभराटीच्या मार्गावर असते. घरात प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी जपण्याचे काम कन्या ही लिल्या पार पडते असे म्हणतात ना, ‘सुख, समृद्धीची पेटी म्हणजे बेटी’, असे सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता भालेराव व आभार रेणू राठी यांनी मानले
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version