Spread the love

 

लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांची स्वप्नपुर्ती!
४० वर्षांपासून प्रलंबित प्राधिकरणाचा तिढा अखेर सुटला शेतकऱ्यांना साडेबाराटक्के परतावा मिळणार!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित प्राधिकरण बाधित शेतकरी कुटुंबांचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप पाठपुरावा करीत होते. त्यांचे अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी आमदार अश्वीनी जगताप यांनी मागणीचा पाठपुरावा केला आणि या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.

महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. या निर्णयानुसार आता बाधित शेतकऱ्यांना सव्वा सहा टक्के जमीन आणि २ चा ‘एफएसआय’ असा साडेबाराटक्के परतावा देण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेला शेतकरी कुटुंबांचा हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे आणि मंत्रीमंडळाचे आभार! हे महायुती सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबिरपणे उभे असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version