Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिशन तर्फे जागतिक महिला दिन व पिंपरी न्यायालयाचा 35 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात माता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कार्यक्रमांचे अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

प्रत्येक महिलांना भारतीय संविधानाने समान हक्क व अधिकार बहाल केले आहेत, कुठलाही भेदभाव न करता तसेच उच्च व नीच्च असमानता न पाहता प्रत्येक स्त्री ही पुरुषाचा खांद्याला खांदा लावून वावरताना दिसते. महिलांचा आदर, प्रेम, सन्मान करणे ही प्रत्येक व्यक्ती ची जबाबदारी आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष  हिराबाई गोवर्धन घुले (मा.उपमहापौर पि.चि.म.न.पा), प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री कल्पना भावसार, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, ॲड.रंजना भोसले (मा.नगर अध्यक्षा न.प ) व सौ.सुहिता आनंदा ओव्हाळ (महिला व बालविकास अधिकारी म.राज्य) ,  सुवर्णा सुरेश नढे ( उपाध्यक्षा ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ) यांनी महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन महिलांचा आदरपूर्वक सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास राजकीय, वकिली, पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील महिलांचा या मंचावर सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी विविध मनोरंजन, सांस्कृतिक  कार्यक्रम तसेच बालकलाकार ग्रूप चे कराटे प्रशिक्षण शो चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आलेले. वकिली क्षेत्रातील महिला मान्यवर ॲड.तारा नायर, ॲड.जयश्री कुटे,ॲड.अल्पना रायते, ॲड. मनीषा महाजन, ॲड. वर्षा भोसले, ॲड.सुजाता कुलकर्णी, ॲड.पदमावती पाटील, ॲड.मंदाकिनी कुंभार, ॲड.ममता कांबळे,ॲड. अनुराधा खंडागळे, ॲड.संकल्पा वाघमारे, ॲड.धनश्री सोनवणे, ॲड. सुषमा नामदास, ॲड.गौरी म्हस्के आदी उपस्थित होत्या

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version