Spread the love

जागतिक महिलादिनानिमित्त विशेष मुलाखती

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समस्त महिला वर्गांना जागतिक महिला दिनांच्या शुभेच्छा ! आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्चला जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जाणारा दिवस आहे.

जगभरातील सर्व महिलांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अशा परिस्थितीत प्रत्येक स्त्रीला सन्मान देणे आणि त्यांचे महत्त्व समजून घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी बनते. महिला कोणत्याही बाबतीत मागे नाहीत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. समाजाच्या प्रगतीत पुरुषांइतकाच महिलांचाही वाटा आहे, पण तरीही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांइतकीच संधी आणि सन्मान मिळत नाही. आजही त्यांना समानतेच्या हक्कासाठी अनेक ठिकाणी झगडावं लागलं, लढावं लागतं.महिलादिनानिमित्त आमदार अश्विनी जगताप यांनी आपला राजकीय प्रवास महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजकडे व्यक्त केला.

आपल्या राजकीय जीवन प्रवासाबद्दल महातस्थ8 ब्रेकिंग न्यूजशी बोलताना त्या म्हणाल्या माझे वडील डीवायएसपी होते. त्यांचा जीवन प्रवास जवळून बघितला त्यांची लोकांसाठी असणारी धावपळ, तळमळ होती. ते मी बघत आले होते . त्यामुळे राजकारण तस नवीन नाही. 35 वर्षांपूर्वी जगताप साहेबांबरोबर लग्न झाले. त्यावेळी ते स्थायी समिती चे अध्यक्ष होते. त्यामुळे मी त्यांच्याकडून नवीन मविन गोष्टी शिकत गेले. अनेक पाने उलगडत गेली.साहेबांच्या प्रत्येक क्षणाची मी साक्षीदार आहे. प्रत्येक चर्चा साहेब माझ्या बरोबर करायचे .दोघांच्या विचाराने आम्ही पुढे गेलो. एकत्रित रित्या बाहेरच्यांचा जरी विचार घेत असले तरी एक सामान्य स्त्री पाहत गेले. माझी पत्नी कोणती तरी मोठी बाई आहे. असे न करता एक सामान्य स्त्रीला कसे वाटेल या दृष्टीने ते बघत गेले. सामान्यपणे बघत गेले त्यातूनच माझा प्रवास सुरु झाला.

कोरोनाच्या काळात अन्नदान केले. स्वतःला झोकून दिले. त्यात त्यांनी मला पण घेतले. तुझ्या हाताचे जेवण जर रुग्णांना दिले तर त्यात आपल्याला कोरोनासारख्या महामारीला जीवनदान दिले.यातच माझे भाग्य समजते. १५० किलोचा कोबी पहिल्यांदा फोडणीला टाकला आणि तिथून पुढे माझा समाज कार्यतला प्रवास सुरु झाला. समाजकारणात जास्त सक्रिय झाले. आणि साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. बचत गटाच्या माध्यमातून जास्तपणे सक्रिय झाले.

विकास कामे मार्गी लागत असताना साहेबांचे निधन झाले. पोटनिवडणुका येऊ घातल्या आणि भाजपने माझ्यावरती विश्वास टाकला आणि निवडणुकीचे तिकीट दिले व आमदार झाले. यात नागरिकांचे सहकार्य मिळाले त्यातून च मी स्वतःला सावरले.

पुनावळेचा कचरा प्रकल्प रद्द , पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त वाकड येथे जागा देण्यास मंजुरी मिळाली. कचरा हा प्रश्न विधानसभेत मांडला पाठपुरावा करून तो प्रश्न तडीला लावला. पोलीस आयुक्तालय कुठे ही न जाता माझ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात 5 लाख 65 हजार एवढा मोठा मतदारसंघ आहे. जवळ आयुक्तालय हवे यासाठी प्रयत्न केले.व वाकड मध्ये आयुक्ताल यास जागा उपलब्ध करून देण्यास यश मिळाले.
संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला दरवर्षी दाखवायला लागायचा . तहसीलदार , तलाठी कार्यालयात नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली आणि तो उत्पन्नाचा दाखला 5 वर्षांसाठी केला.

साडे बारा टक्के जमीन परतावा हा विषय मार्गी लावणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसा शब्द दिला आहे. व तो प्रश्न मार्गी लावला जाईल.

आमदारकीची धुरा सांभाळल्यानंतर कोणकोणती विकासकामे मार्गी लागली याबाबत महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजशी बोलताना त्या म्हणाल्या, लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप वैद्यकीय कक्ष, गोरगरीब रुग्णासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत उपलब्ध करून दिली आहे.

पुनावळे कचरा डेपो राज्य शासना कडून रद्द करून घेण्यात यश मिळाले. मोशी रुग्णालयासाठी भाऊंनी प्रयत्न केले होते. ते रुग्णालय पूर्णत्वास आणले. प्राणी संग्रहालयाचा प्रश्न विधानभवनात उपस्थित केला. प्राधिकरणात गेलेल्या जमिनी साडे बारा टक्के परतावासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. तो ही प्रश्न मार्गी लागेल. तसेच पोलीस आयुक्त कार्यालयास जागा उपलब्ध करून दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version