Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीच्या प्रयत्नातील युवकाला अटक केल्यानंतर आता निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या उपनिरीक्षक विकास शेळके याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस उपनिरीक्षक शेळके याच्याकडून ४५ कोटी रुपये किमतीचे ४४.५० किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी (दि.१) पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांकडून सुरुवातीला कारवाई करण्यात आली होती. तेव्हा नमामी शंकर झा (वय ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) याला अटक करून त्याच्याकडून २ कोटी रुपये किमतीचे २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त करण्यात आले होते. मात्र, पुढे जाऊन या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक शेळके याचा थेट सहभाग असल्याचे उघड झाल्याने एकच गोंधळ उडाला. अति वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केलेल्या कसून चौकशी नंतर उपनिरिक्षक शेळके याला मध्यरात्री अटक करण्यात आली असून, त्यानंतर त्याच्याकडून ४४.५० किलो एमडी जप्त करण्यात आले आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version