Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वैशाली देशमाने या श्रीहरी योगा स्टुडिओ या माध्यमातून चिंचवड परिसरातील महिलांचे व शहराबाहेरील महिलांचे सुद्धा योगा क्लास घेतात.

विशेषाता महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात पाहिजे तेवढी आरोग्याची काळजी घेत नाहीत व कुटुंबातील महिला निरोगी तर कुटुंब निरोगी म्हणून प्रत्येक महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे याचं उद्देशाने वैशाली देशमाने यांनी श्रीहरी योगा स्टुडिओ या माध्यमातून महिलांना योगाच्या माध्यमातून आरोग्य सुदृढ राहण्याच्या हेतूने जास्तीत जास्त महिलांचे क्लास व प्रभोधन केले जाते विशेष म्हणजे भारता बाहेरील सुद्धा अनेक महिला या योगा क्लासला जोडल्या आहेत.विविध संस्था,राजकीय व्यक्ती,नागरिक आदी.चिंचवड परिसरातील या क्लास चे कायम कधी पुरस्कार,शुभेच्छा, अभिनंदन,आश्या विविध प्रकारे कौतुक करीत असतात.

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृहात
या वर्षीचा श्रीरंग आप्पा बारणे सोशल फौंडेशन वतीने  वैशाली देशमाने यांना यांना महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे,जेष्ठ साहित्यिक,कवी,नाटक्कार,समीक्षक,
इतिहास संशोधक ,प्रवचनकार,कीर्तनकार,डॉ. सदानंद मोरे,सिने अभिनेते,मा अशोक समर्थ यांच्या हस्ते हा योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला
या वेळी श्रीहरी योगा स्टुडिओच्या महिला सदस्या व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

पुरस्कार मिळाल्यानंतर चिंचवड परिसरातील अनेक नागरिक,लोकप्रतिनिधी, मान्यवर यांनी प्रत्यक्ष ,फोन,मेसेज आदी द्वारे शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version