Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन वतीने “जागतिक महिला दिन २०२४”  चे शुक्रवार दि: ०८/०३/२०२४ रोजी न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाटणी, पुणे १७ या ठिकाणी आयोजनं करण्यात आले आहे.  जागतिक महिला दिना  निमित्त संस्थे तर्फे गेली १०  ते १२ वर्षापासुन महिलांचे जनजागृती, सक्षमीकरण तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यात महिलांचा उचित असा सत्कार करीत आहोत. तरी “सन्मान स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमास  “क्रांतीज्योती मी सावित्रीबाई बोलते” सादरकर्त्या –  महानंदा डाळिंबे   (प्रवचनकार) यांचा एकपात्री प्रयोग होत आहे.

संस्थे तर्फे रहाटणी काळेवाडी, पिंपळे सौदागर, थेरगाव परिसरातील साहित्य, कला, क्रीडा, योग, पत्रकार, सफाई कामगार, संस्कृती, डॉक्टर, शिक्षण, उद्योग, कृषी, वकिली क्षेत्रात ह्यांना उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करीत आहोत. तरी सदर क्षेत्रातील महिलांनी आपली सविस्तर माहिती ०६/०३/२०२४ पर्यंत संस्थे  न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाटणी, पुणे १७  (9764524769/9921695242) मध्ये पाठवावी अशी माहिती संस्थेचे मुख्याध्यापक नाजनीन शेख व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत ह्यांनी दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version