Spread the love

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात संत गाडगे महाराज यांचे स्मारक उभारावे अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे युवा नेते निखिल उमाकांत दळवी यांनी आयुक्तांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगे महाराज यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते, तर संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त मनपा वतीने स्वच्छता अभियान राबविले जाते, परंतु ज्या महान संतांने अंधश्रद्धा निर्मूलनासह स्वच्छतेचा मंत्र संपूर्ण देशाला दिला अशा महान राष्ट्रीय संतांचे एकही स्मारक पिंपरी चिंचवड शहरात नाही ही बाब निश्चितच समाज बांधवांना नाराज करणारी आहे.  पिंपरी चिंचवड शहर संत गाडगे महाराज यांचे स्मारक उभारण्यात यावे, असे ही निवेदनात म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version