Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्वती येथील सरिता विद्यालय आणि सुंदराबाई राठी हायस्कूल येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले.

या अभियानात ‘सेफ मोबिलिटी’, ‘मोबिलिटी स्नॅपशॉट बाय चिल्ड्रन अँड यंग अडल्ट्स’ आणि ‘डेंजरस स्पॉट’ या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी घोषवाक्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रम घेण्यात आले.
विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, कायद्यातील विविध कलमे, वाहतूक चिन्हे आणि मोटार वाहन कायद्यातील तरतुदींची माहिती देण्यात आली. तसेच रुग्णवाहिकेला प्रथम प्राधान्य द्या, नो हॉर्न, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, रस्त्यावर उजव्या बाजूने चालणे आदी सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

भविष्यात रस्ता सुरक्षा विषयातील ऑडिटर तयार करण्याच्या उद्देशाने मित्र मंडळ चौकात विद्यार्थ्यांना घेऊन ‘एव्हिडन्स बेस्ड रोड सेफ्टी ऑडिट’ कशा पद्धतीने करावे, याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन सेफ इंडिया फॉर एव्हरीवन, ओडिशाचे संचालक व रस्ता सुरक्षा ऑडिटर दिलीप कुमार पांडा, पुणे वाहतूक शाखा आणि ऑटो लिव्ह कंपनी यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष राजू घाटोळे, सल्लागार संतोष कपटकर, प्रोग्राम कोऑर्डिनेटर व स्वयंसेवी संस्था सातारा संचालिका शीतल विधाटे, माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, कार्यकारी संचालक मनोज विधाटे यांच्यासह शिक्षक, मुख्याध्यापिका आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सर यांनी केले, तर आभार व विद्यार्थ्यांचा अभिप्राय नीताली हरगुडे यांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version