
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित ‘कलाकार कट्टा – पुष्प १०वे’ हा अनेक कलांनी युक्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. विविध कलाप्रकारांच्या बहारदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
राज आहेरराव यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हणाले, आपल्या शहरातील कलाकारांच्या एकत्र कलांना व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे, कलाकारांना नवलौकिक मिळवून देणे हे भाऊसाहेब भोईर यांचे स्वप्न आहे. त्यांच्यासाठी निःस्वार्थ भावनेने सर्व सहकारी काम करत आहे. प्रत्येक कलाकार दुसऱ्या कलाकारांचा ऋणी आहे. ते फेडण्यासाठी त्याने दुसऱ्या कलाकारांना दाद देणे महत्वाचे आहे.
यावेळी छाया गायकवाड आणि आरती कोरडे यांच्या चित्रकलेच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सुभाष चावन यांच्या शंख वादनाने झाली. नृत्यांगना ऋतुजा देहूगावकर हिने सादर केलेल्या कथ्थक नृत्याने रसिकांची मने जिंकली. अनुराधा कणसे तसेच नेहा कुलकर्णी यांचे कविता सादरीकरण रसिकांना भावले.
वंदना मातेरे आणि सुनीता साळुंके यांनी कराओके गायन सादर केले. ईश्वर साठे या बालकलाकार यानी क्लारनेट वाद्य वाजवून कार्यक्रमाची रंगत वाढवली. कु. वैष्णवी कांबळे या विद्यार्थिनीने स्वागत सादर केले. अखेरीस यांच्या भजन सादरीकरणाने समारोप करण्यात आला.
कलाकार कट्याचे संयोजन संतोष रासने, हरीश मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी तर आभार प्रदर्शन आसाराम कसबे यांनी केले.
