Spread the love

 

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोणावळा शहरातील पूरग्रस्तांना टाटा कंपनीकडून त्वरित मदत मिळवून देण्याबाबत कंपनीचे अधिकारी व नगरसेवकांच्या उपस्थितीत आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत पूरग्रस्तांच्या मदतीसोबतच शहरातील सायकल ट्रॅक, रस्ता सुधारणा आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच लोणावळा शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या काही ठोस व नाविन्यपूर्ण विकासकामांचे सादरीकरण करण्यात आले.

याशिवाय, मावळ तालुक्यात सध्या सुरू असलेल्या घरकुल योजना, स्मशानभूमी व ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापनासाठी वनविभाग, पीएमआरडीए तसेच महसूल विभागाकडून आवश्यक असणाऱ्या शासकीय जागांचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. संबंधित जागांच्या प्रस्तावांना तातडीने गती देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लोणावळा शहर व मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुनील शेळके यांचा पाठपुरावा निरंतर सुरू राहणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version