Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळ सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक स्नेहमेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री ना. व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शामला पंडित (दीक्षित ) यांचे १८ वे पुस्तक ‘मधुकुंज’ प्रणाली प्रकाशन , पुणे . प्रकाशित झाले .

कवयित्री शामला रामचंद्र पंडित (दीक्षित ) यांचे १८ वे मधुकुंज सचित्र ,रंगित कवितासंग्रह आहे . मधुकुंजसाठी उपमुख्यमंत्री ना . मा सुनेत्रा अजित पवार  यांचे शुभेच्छा पत्र लाभले आहे . जेष्ठ साहित्यिक  बबन पोतदार (ग्रामीण कथाकार) यांनी सुंदर आशयघन, प्रासादिक, प्रस्तावना दिली आहे . दत्तात्रय अत्रे (राजज्योतिषी, लेखक), . कल्याण पानगे (माजी शिक्षणाधिकारी),  शारदा पानगे, (अध्यापिका, लेखिका, कवयित्री) कविता खुटवड (अध्यापिका श्री म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी) सुंदर शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत.

संग्रहामध्ये विविध काव्यप्रकार समाविष्ट झालेले आहेत .एकूणच पुस्तक सर्वांग परिपूर्ण झालेले आहे .
सोनाली दिपक मोरे यांनी लेआउट केलेला आहे .  .दिपक मोरे  यांनी पुस्तक बांधणी उत्कृष्ट केली.कु. प्रणाली पंडित, प्रणाली प्रकाशन , पुणे यांचे मार्फत पुस्तक तयार झाले .  दराडे यांनी सुंदर मुखपृष्ठ मलपृष्ठ करून पुस्तक तयार केले आहे .

या प्रसंगी महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदिप कदम खजिनदार मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव, सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सविता नाणेकर, उपाध्यक्ष डॉ. विलास वाणी, सचिव बंडू दातीर, खजिनदार चंद्रशेखर वाघमारे, अनिल देवकाते , सेवक कल्याण निधीचे अध्यक्ष डॉ. तुषार शितोळे, सचिव श्रीहरी लवांडे, ग्राहक संस्थेचे अध्यक्ष संतोष पठारे, सचिव अनिल जाचक उपस्थित होते. संस्थेच्या शाखांतील प्राचार्य ,मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक , अध्यापक वृंद , विद्यार्थी , पालक उपस्थित होते .

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version