
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत तुकाराम हास्य योग परिवाराच्या वतीने दि. २१ ऑगस्ट रोजी तुकाराम उद्यानात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध कला प्रकारांनी रंगलेल्या या कार्यक्रमाला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात ‘हर हर शंभो’, भारुड, ‘सावर सावर’ व ‘स्वर्गात आकाशगंगा’ नृत्य, ‘ऋणानुबंध’ नाटक, ‘अष्टमी’ देवीचे गाणे, विनोदी कार्यक्रम, कोळीगीत, ‘नसती उठा ठेव’ संवाद तसेच देशभक्तीपर गीत असे विविध दहा कार्यक्रम सादर करण्यात आले. कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी ऑगस्ट महिन्यातील सभासदांचे वाढदिवसही उत्साहात साजरे करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती इंगोले यांनी केले, तर नरेंद्र मिसाळ यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला संघातील आजी-माजी अध्यक्ष तसेच बहुसंख्य सदस्य उपस्थित होते. संघाच्या प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

